
Nykaa Share Price | नायका कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 180.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नायका कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला मार्च 2024 तिमाहीत मजबूत कमाईची अपेक्षा आहे. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी नायका स्टॉक 0.98 टक्के घसरणीसह 177.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( नायका कंपनी अंश )
नायका कंपनीने जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत आपल्या महसुल संकलनात मजबूत वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे. पर्सनल केअर विभागामध्ये नायका कंपनीचे एकूण व्यापारी मूल्य वार्षिक 30 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या विक्री मूल्यात 25 टक्के वाढ अपेक्षित आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीत नायका कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर दुप्पट नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुल संकलनात 22 टक्के वाढ झाली होती. नायका कंपनीचा EBITDA मार्जिन 5.3 टक्केवरून 5.5 टक्केवर पोहचला होता.
नायका कंपनीचा IPO 2021 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या शेअर्सची किंमत बँड 1125 रुपये निश्चित करण्यात आली होती. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर नायका कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1 शेअरवर 5 बोनस शेअर्स वाटप केले होते. मागील सहा महिन्यांत नायका कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात नायका स्टॉक 40 टक्के वाढला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 195 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.