13 December 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

Money Making Share | पैसाच पैसा! या शेअरने 1113% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट तपासा, खरेदी करणार?

Money Making Share

Money Making Share | Advait Infratech Ltd या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी 2022 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कामी करून दिली आहे. आता कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. सध्या अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 623 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. 23 डिसेंबर 2022 ही तारीख कंपनीने ही रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 419.17 टक्क्यांची मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Advait Infratech Share Price | Advait Infratech Stock Price | BSE 543230)

कंपनीचे स्पष्टीकरण :
स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, ” लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन ॲक्ट 2015 मधील कलम 42 नुसार सेबीला सूचित केले जाते की, Advait Infratech Ltd कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. बोनस शेअर वाटपसाठी कंपनीने शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 ही तारीख “रेकॉर्ड डेट” म्हणून जाहीर केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देईल”.

419.17 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला :
Advait Infratech Ltd कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 623.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील क्लोजींग किंमत 635.00 रुपयेच्या तुलनेत शेअर 1.89 टक्के पडला होता. शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी हा शेअर 623 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे शेअर्स 28/09/2020 रोजी BSE निर्देशांकावर सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचा IPO आल्यापासून मागील 2 वर्षात शेअरची किंमत 1,113.24 टक्क्यांनी वाढली आहे. 20 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर 81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मग त्यात वाढ होत गेली आणि शेअर वर्तमान किंमतीपर्यंत पोहचला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी या शेअर मध्ये पैसे लावले होते, त्यांना 669.14 टक्केचा मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. वार्षिक दर वाढ आधारावर 3 जानेवारी 2022 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 120 रुपयेवरून सध्याच्या ट्रेडिंग किंमतीपर्यंत पोहचली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 419.17 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

6 महिन्यांत दिला 231.38 टक्के परतावा :
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 231.38 टक्के मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. मागील 1 महिन्यात या शेअरची किंमत 7.01 टक्के कमजोर झाली आहे. या कंपनीच्या स्टॉकने 15/11/2022 रोजी 720.00 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. शेअर 24/12/2021 रोजी 75.00 रुपये या आपल्या 52 – आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक आपल्या 1 वर्षाच्या नीचांक पातळी किमतीच्या तुलनेत 730.66 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या कंपनीच्या प्रमोटर्स कडे 73.52 टक्के भाग भांडवल होते. किरकोळ गुंतवणूकदारांकडे 26.48 टक्के भाग भांडवल आहेत. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 317.73 कोटी आहे असून ही कंपनी मुख्यतः औद्योगिक सेवा प्रदाता म्हणून काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Advait Infront Ltd company has announced Bonus shares to existing shareholders on record date on 17 December 2022.

हॅशटॅग्स

Money Making Share(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x