
Nykaa Share Price| FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स म्हणजेच नायका कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून पडझड पाहायला मिळत आहे. नायका कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.13 टक्के पडले होते, आणि त्याची किंमत 1,147.40 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक पातळीवर गेली होती. नायकाची 52 आठवड्यांची सर्वात नीचांकी किंमत 1147.40 रुपये ही नोंदवली गेली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये लिस्टिंग झाल्यापासून नायका कंपनीचा शेअर सातत्याने एक नवीन नीचांकी पातळी तयार करत आहे.
सध्या नायका कंपनीचा स्टॉक इतका गडगडला आहे की, तो आपल्या 26 नोव्हेंबर 2021 रोजीच्या 2,574 रुपयांच्या या उच्चांकी IPO ओपनिंग किमतीच्या तुलनेत 55 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे. मागील वर्षी 10 नोव्हेंबर 2021 रोजी नायका कंपनीचे शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. सध्या, नायका कंपनीचा शेअर आपल्या 1,125 रुपये प्रति शेअर या IPO इश्यू किमतीपेक्षा 1.96 टक्के अधिक किमतीवर ट्रेड करत आहे.
कंपनीचे बोनस शेअर्स जाहीर :
या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. नायकाने नुकताच 3 ऑक्टोबर 2022 रोजी बोनस शेअर्स वितिरीत करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीने 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचे निश्चित केले आहे. कंपनी आपल्या प्रत्येक एक विद्यमान शेअरवर पाच बोनस शेअर्स मोफत देणार आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ता स्टॉकमध्ये 9 टक्क्याची घसरण पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 14.23 टक्के गडगडला असून त्यात दर वार्षिक दराने 45 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.