
Nykaa Share Price | भारतातील प्रसिध्द कॉस्मेटिक ब्रँड नायकाने आपल्या गुंतवणूकदारांना दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी भेट देण्याचे घोषित केले आहे. नायकाने SEBI नियमकाला कळवले आहे की, संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. कंपनी प्रत्येक 1 विद्यमान शेअरमागे आपल्या गुंतवणूकदारांना 5 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी नायकाचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/BSE निर्देशांकावर वर 8 टक्के वाढीसह 1370.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
रेकॉर्ड तारीख जाहीर :
नायकाने संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स ल मान्यता दिली आहे, आणि त्यासाठी रेकॉर्ड तारीखही निश्चित केली आहे. नायकाने SEBI एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी आपल्या गुंतवणूकदारांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख गुरुवार 3 नोव्हेंबर 2022 अशी निश्चित केली आहे. 2 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांनाबोनस शेअर्स वितरीत केले जातील. नायकाच्या मूळ कंपनीचे नाव FSN E-Commerce Ventures Ltd आहे. शेअर्स ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2574 रुपये आहे. त्याच वेळी, नायकाची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 1208.40 रुपये होती.
चालू वर्षात शेअर ची वाटचाल :
नायकाचे शेअर्स चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत 35 टक्के खाली पडले आहेत. चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 2086.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.3 ऑक्टोबर 2022 रोजी नायकाचे शेअर्स BSE निर्देशांकावर 1370.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नायकाचे शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत 24 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात नायका कंपनीचे शेअर्स 39 टक्के खाली पडले होते. त्याचवेळी, नायकाच्या शेअर्सनी मागील ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.