
Nykaa Share Price | नायका भारतातील प्रसिद्ध कॉस्मेटिक्स-टू-फॅशन रिटेलर कंपनीच्या व्यवस्थापन स्तरावरील कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नायका कंपनीमध्ये एकापाठोपाठ मोठ्या पदावरील अधिकारी राजीनामा देत आहेत. 2023 मध्ये एप्रिलपासून आतपर्यंत कंपनीच्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन पदत्याग केला आहे.
नायका कंपनीने 2 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केलेल्या निवेदनात माहिती दिली की, एप्रिल 2023 पासून कंपनीच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन काम सोडले आहे. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 3.17 टक्के वाढीसह 148.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच नायका कंपनीच्या मुख्य विपणन अधिकारी शालिनी राघवन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी सीईओ विकास गुप्ता यांनी आपल्या चीफ बिझनेस ऑफिसर पदाचा राजीनामा दिला आहे. तर गोपाल अस्थाना आणि चीफ कमर्शियल ऑफिसर मनोज गांधी यांच्यासह नायका कंपनीच्या सुपरस्टोअरच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 143.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीने दिलेल्या निवेदनात माहिती दिली आहे की, “स्ट्रॅटेजिक रिअलाइनमेंट खर्चाचे तर्कसंगतीकरण आणि व्यवसायाची वाढती जटिलता लक्षात घेऊन कंपनीने आपल्या नेतृत्वाची भूमिका वाढवली आहे”.
नायका ही कंपनी आपल्या वेबसाइट आणि स्टोअरच्या माध्यमातून सौंदर्य प्रसाधने आणि उत्पादने विकण्याचे काम करते. नायका कंपनीची प्रत्यक्ष स्पर्धा टाटा समूह आणि रिलायन्स कंपनीसोबत आहे. नायका कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बजारात लाँच करण्यात आला होता. सध्या हा स्टॉक 246.16 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 41 टक्केपेक्षा जास्त कमजोर झाले आहेत.
नायका कंपनीचा IPO नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. नायका कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यूची किंमत 1125 रुपये जाहीर करण्यात आली होती. या कंपनीचा शेअर 2000 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी नायका कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले होते. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 87 टक्के खाली कमजोर झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.