 
						Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअर मध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. ऑनलाइन सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या नायका कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. FSN ई कॉमर्स ही नायका कंपनीची मूळ कंपनी आहे.
या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ एका ब्लॉक डीलमुळे पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार नायका कंपनीच्या शेअरमध्ये 60.2 लाख शेअर्सची ब्लॉक डील झाली आहे. त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला आहे. आज बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 4.09 टक्के वाढीसह 143.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉक एक्स्चेंजकडे उपलब्ध असलेल्या शेअर होल्डिंग डेटानुसार नायका कंपनीच्या प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाने 30 जून 2023 रोजी पर्यंत 52.28 टक्के भाग भांडवल होल्ड केले होते. उर्वरित भाग भांडवल सार्वजनिक शेअर होल्डरने धारण केले आहेत. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलच्या तज्ञांच्या मते नायका कंपनीचे शेअर्स पुढील एका वर्षात 55 टक्के अधिक वाढू शकतात. म्हणून ब्रोकरेज फर्मने नायका स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 210 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
ब्रोकरेज फर्मने विश्वास व्यक्त केला आहे की, नायका कंपनी सौंदर्य प्रसाधन आणि पर्सनल केअर विभागात मजबूत कामगिरी करत आहे. JM Financial फर्मने आपल्या अहवालात नायका स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 6.25 टक्के मजबूत झाले आहेत. तर मागच्या सहा महिन्यात हा स्टॉक 4.11 टक्के कमजोर झाला होता.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 36.47 टक्के स्वस्त झाली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 2.41 टक्के वाढीसह 138.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता, आणि तेव्हा शेअरची किंमत 1125 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		