
OK Play Share Price | ओके प्ले इंडिया कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 200 टक्क्यांनी वाढली आहे. FII देखील ओके प्ले इंडिया कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
ओके प्ले इंडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने 5 लाख शेअर्स मॉरिशसमधील परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार संस्था सेंट कॅपिटल फंडला 125 रुपये प्रति शेअर किमतीवर जारी केले आहेत. मॉरिशस स्थित परकीय गुंतवणूक संस्थेने CoopMoney कंपनीच्या प्रेफरंस शेअर्स ऑफरसाठी अर्ज केला होता. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी ओके प्ले इंडिया कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 172.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओके प्ले इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवारी पार पडलेल्या बैठकीत FII ला शेअर वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार ओके प्ले इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने FII ला 125 रुपये प्रति शेअर किमतीवर 5 लाख शेअर्स जारी केले आहे. या शेअर्सचे एकूण मूल्य 6.25 कोटी रुपये आहे.
ओके प्ले इंडिया कंपनीचे शेअर्स आज 172 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्याच्या किमतीनुसार मॉरिशस स्थित FII च्या 6.25 कोटी रुपये गुंतवणुकीचे मूल्य 7,82,50,000 रुपये पेक्षा जास्त वाढले आहेत. ओके प्ले इंडिया लिमिटेड कंपनीने भांडवल उभारणीसाठी 5 लाख शेअर्स सेंट कॅपिटल फंडला 25.75 कोटी प्रेफरन्स शेअर्स केले होते. यासाठी कंपनीने प्रति शेअर 125 रुपये किंमत आकारली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.