
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीच्या शेअर्सने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. आज ही स्टॉक मजबूत तेजीसह ट्रेड करत होता. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉकने कडक कमाई करून दिली आहे.
एक लाख गुंतवणुकीवर करोडोचा परतावा दिला
मागील नऊ वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर्स धारकांना एक लाख गुंतवणुकीवर करोडोचा परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे दोन पट वाढले आहेत. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.93 टक्के वाढीसह 806.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.08 कोटी रुपये परतावा दिला
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या अवघ्या 9 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर 14 मार्च 2014 रोजी 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर स्टॉकमध्ये 10747 टक्के वाढ होऊन स्टॉक 806 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 9 वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 108 पट अधिक वाढवले आहेत. अवघ्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांनी 1.08 कोटी रुपये कमावले आहे.
अवघ्या चार महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले
23 फेब्रुवारी 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 374.35 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर 5 जून 2023 रोजी हा स्टॉक 819.95 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचला होता. म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या चार महिन्यांत दुप्पट झाले आहेत.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने अवघ्या चार महिन्यांत 119 टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे. ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक बसेसचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. मार्च 2023 मध्ये तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला 550 बसेसची ऑर्डर प्राप्त झाली होती.
2100 इलेक्ट्रिक बसेसची सर्वात मोठी ऑर्डर
मुंबईच्या सार्वजनिक वाहतूकदार बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टकडून देखील ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला 3675 कोटी रुपये मूल्याची 2100 इलेक्ट्रिक बसेसची सर्वात मोठी ऑर्डर देण्यात आली होती. एक महिनाभरापूर्वी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने हायड्रोजन बसेससाठी रिलायन्स कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.