15 December 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्सबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांनी पुढची मजबूत टार्गेट प्राइस जाहीर केली

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत पाहायला मिळत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात होता. गुरुवारी टाटा पॉवर स्टॉक इंट्राडे ट्रेडमध्ये 2.6 टक्के वाढीसह 366.55 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2.54 टक्के वाढीसह 366 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च फर्मने टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे दीर्घकालीन रेटिंग ‘IND AA’ वरून ‘IND AA Plus’ असे अपग्रेड केले आहे. त्यामुळे टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 356.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्या तुलनेत गुरूवारी हा स्टॉक 2.65 टक्के वाढला होता. टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 182.45 रुपये होती.

मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 65.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.16 लाख कोटी रुपये आहे. आता IIFL सिक्युरिटीज फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर A ग्रेड रेटिंग दिली आहे.

IIFL सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे, “टाटा पॉवर कंपनीबाबत आमचा अंदाज आहे की टाटा पॉवर कंपनीला वाढत्या ऊर्जा मागणीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. आणि वीज उपभोगातील सुधारणा आणि कमी झालेल्या AT&C तोट्यामुळे कंपनीच्या वीज वितरण विभागामध्ये चांगली कमाई झाली आहे”. त्यामुळे टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

ICICI Direct रिसर्च फर्मने गुंतवणुकदारांना टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 342 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, टाटा पॉवर स्टॉक 20-दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर उथळ रिट्रेसमेंटनंतर पुन्हा तेजीत येण्याची शक्यता आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर 450 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने टाटा पॉवर स्टॉकवर 390 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 27 January 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x