
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 1,345 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीने तेलंगणा राज्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन उत्पादन सुविधा उभरण्यासाठी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कंत्राट दिले आहे.
ही बातमी येताच ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के घसरणीसह 1,279.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी सुविधा केंद्र उभारण्याचा करार केला आहे. सीतारामपूर, हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी 150 एकर जमिनीवर मेघा अभियांत्रिकी अँड पायाभूत सुविधा ही कंपनी हे काम पूर्ण करणार आहे. या नवीन ईव्ही उत्पादन सुविधा केंद्राचे बांधकाम 12 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स काल 2.93 टक्क्यांच्या वाढीसह 1345 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील एका महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 37.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 169.58 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 98.33 टक्के नफा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या EV बस निर्मात्या कंपनीचे शेअर्स 147.08 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,465 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 374.35 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.