15 December 2024 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

PAN-Aadhaar Linking | पॅन कार्डधारकांना 10 हजार रुपयांचा दंड आकारणार, टाळण्यासाठी पूर्ण करा के काम, खूप कमी वेळ

PAN-Aadhaar Linking

PAN-Aadhaar Link | आयकर विभागाने पुन्हा एकदा पॅन कार्ड धारकांना सतर्क केले आहे. 1 एप्रिलपासून अनेक पॅनकार्ड बंद होणार आहेत, म्हणजेच 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करावं लागेल, असं विभागाकडून सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही 1 एप्रिलपासून हे पॅनकार्ड वापरत असाल तर आयकर विभाग तुम्हाला 10 हजार रुपये दंड आकारू शकतो. सध्या पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 हजार रुपये मोजावे लागत आहेत. जर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं तर तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागेल. जाणून घ्या तुम्ही कोणत्या प्रकारच्या अडचणीत येऊ शकता आणि पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया देखील जाणून घ्या.

1000 रुपये भरून १० हजार रुपयांचा दंड टाळा
1000 रुपयांचे चलन जमा करून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) ३० जून २०२२ पासून विलंब शुल्क आकारत आहे. जे लोक आयकर कायदा 1961 नुसार सूट या श्रेणीत मोडत नाहीत, त्यांना आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यांचे पॅनकार्ड १ एप्रिलपासून निष्क्रिय होणार आहे.

१० हजार रुपये दंड आकारण्यात येणार
जर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं, तर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा स्टॉक अकाउंटसाठी त्याचा वापर करू शकत नाही. याशिवाय या कार्डचा कुठे तरी कागदपत्र म्हणून वापर केला तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड होऊ शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 272 बी अंतर्गत आयकर विभाग तुमच्याकडून 10 हजार रुपये वसूल करू शकतो.

पॅन कार्ड कसे लिंक करावे ते येथे आहे
* तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता.
* आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.
* येथे तुम्ही पॅन कार्डला आधार क्रमांकाशी जोडू शकता.
* यानंतर तुम्हाला तुमची माहिती टाकावी लागेल. जसे की स्वत:चे नाव आणि जन्मतारीख.
* जर तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख म्हणून फक्त 1985 असेल तर बॉक्सवर योग्य ती खूण टाका.
* पडताळणी करण्याकरीता कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
* यानंतर तुम्हाला “लिंक आधार” लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.
* अशात तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं जाईल.

आपले पैसे अडकू शकतात
* पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने तुम्ही कुठूनही खरेदी करू शकणार नाही.
* तुम्हाला कोणत्याही बँकेत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही किंवा काढता येणार नाही.
* पॅन कार्ड निष्क्रिय असेल तर तुम्हाला टॅक्स रिटर्न भरता येणार नाही. अशावेळी तुमचा टीडीएसही बुडू शकतो.
* म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करताना अडचणी येऊ शकतात.
* सरकारी योजनांचा लाभ मिळण्यातही अडचणी येतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PAN-Aadhaar Linking process check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

#PAN Aadhaar Linking(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x