Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?

Patanjali Foods Share Price | योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली फुड्स’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण सुरू झाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी पडले होते. तर शुक्रवार दिनाक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 898.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘पतंजली फुड्स’ कंपनीवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज द्वारे कठोर कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे या शेअरमध्ये घसरण सुरू झाली आहे. खरं तर स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीने ‘पतंजली फूड्स’ कंपनीच्या प्रवर्तकांचे 29.26 कोटी शेअर्स गोठवले आहेत. तथापि ‘पतंजली फूड्स’ कंपनीने शेअर्स गोठवण्याच्या सेबीच्या आदेशाचा कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे म्हंटले आहे. (Patanjali Foods Ltd)
संपूर्ण प्रकरण :
स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीने ‘पतंजली फूड्स’ कंपनीच्या प्रवर्तक समुहाचे 29.26 कोटी शेअर्स ठरवून दिलेल्या वेळेमध्ये सार्वजनिक शेअरहोल्डिंगच्या किमान नियमांची पूर्तता न केल्यामुळे गोठवले. सेबीच्या नियमानुसार जर एखाद्या सूचिबद्ध कंपनीमध्ये सार्वजनिक शेअरहोल्डिंग 25 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर कंपनी तीन वर्षांच्या कालावधीत सार्वजनिक शेअरहोल्डिंग 25 टक्क्यांपर्यंत खाली आणेल, असा नियम आहे. सार्वजनिक शेअरहोल्डिंग 10 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास कमाल 18 महिन्यांच्या कालावधीत किमान 10 टक्क्यांपर्यंत वाढवणे बंधन कारक आहे.
या अंतर्गत ‘पतंजली फूड्स’ कंपनीने मार्च 2022 मध्ये फॉलो ऑन ऑफर जाहीर केली होती. कंपनीने या फॉलो ऑन ऑफर अंतर्गत 66.2 दशलक्ष इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विक्रीसाठी जारी केले होते. या मागे कंपनीची सार्वजनिक शेअरहोल्डिंग 19.18 टक्क्यांपर्यंत वाढवणे हा हेतू होता. तथापि पतंजली फूड्सने सेबीच्या किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग नियमांचे पालन केले नाही. म्हणून सेबीने कंपनीवर कठोर कारवाई केली. आणि त्यामुळे शेअरची किंमत पडायला सुरुवात झाली. ‘पतंजली फुड्स’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 33,484.52 कोटी रुपये आहे. पतंजली फूड्स कंपनीचे नाव पूर्वी ‘रुची सोया’ असे होते, मागील वर्षी ते बदलून ‘पतंजली फुड्स’ असे करण्यात आले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Patanjali Foods Share Price 500368 return on investment check details on 18 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON