4 December 2024 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Patel Engineering Share Price | 58 रुपयाचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, रॉकेट स्पीडने कमाई होणार - Marathi News

Highlights:

  • Patel Engineering Share PriceNSE: PatelEngineering – पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश
  • पटेल इंजिनीअरिंग कंपनी शेअरमध्ये तेजी
  • कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली – Patel Engineering Share
  • महाराष्ट्र सरकारकडून 317.60 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच त्यांना (NSE: PatelEngineering) सिक्कीममधील एका जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी एनएचपीसी या सरकारी कंपनीकडून ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 240 कोटी रुपये आहे. (पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश)

पटेल इंजिनीअरिंग कंपनी शेअरमध्ये तेजी
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी या कंपनीचे शेअर 3 टक्क्यांच्या वाढीसह 60 रुपये किमतीवर पोहोचले होते. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी पटेल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 58.98 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली
पटेल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 41.99 रुपये होती. पटेल इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, त्यांना मिळालेला नवीन प्रकल्प 18 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला जाईल. NHPC लिमिटेड कंपनीने तीस्ता-V पॉवर स्टेशन सिक्कीमसाठी ‘डायव्हर्शन टनेल’ चे ‘टनल स्पिलवे’ सिस्टीममध्ये रूपांतर करण्याचे काम पटेल इंजिनिअरिंग कंपनीला दिले आहे.

महाराष्ट्र सरकारकडून 317.60 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
पटेल इंजिनीअरिंग ही कंपनी जलविद्युत आणि धरण प्रकल्पांसाठी पाटबंधारे, बोगदे आणि भूमिगत कामांमध्ये एक्स्पर्ट मानली जाते. मागील महिन्यात पटेल इंजिनीअरिंग कंपनीने त्यांच्या JV भागीदारासोबत महाराष्ट्र सरकारच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून 317.60 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत कंपनीला जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पाणी उचलण्याच्या व्यवस्थेचे बांधकाम, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

एप्रिल-जून 2024 या तिमाहीत पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या नफ्यात 26 टक्के वाढ नोंदवली गेली होती. या तिमाही कंपनीने 48.17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 38.29 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधील महसुल 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 1101.66 कोटी रुपये नोंदवला गेला होता. 2023 च्या जून तिमाहीत कंपनीचा महसूल 1118.61 कोटी रुपये होता.

Latest Marathi News | Patel Engineering Share Price 21 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x