13 December 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत
x

Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 342 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 मे 2021 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 12.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.63 टक्क्यांच्या वाढीसह 55.96 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4725.13 रुपये आहे. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 0.71 टक्के घसरणीसह 55.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 101 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीचे शेअर्स 200 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. 2024 हे वर्ष स्टॉकसाठी फारसे चांगले राहिले नाही. या काळात कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 24.15 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये होती.

मागील 6 महिन्यांत पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज हाऊसचा विश्वास आहे की, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 99 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. पटेल इंजिनीअरिंग ही कंपनी मुख्यतः सिव्हिल इंजिनीअरिंग संबंधित प्रकल्प उभारण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी हायड्रो प्रकल्प, धरणे, बोगदे, रस्ते, रेल्वे या संबंधित प्रकल्पाचे काम करते. आता ही कंपनी रिअल इस्टेट व्यवसायात देखील आपला व्यवसाय विस्तार करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE Live 13 May 2024.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x