1 May 2024 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Stock in Focus | फ्री बोनस शेअर्सनंतर हा शेअर एकदिवसात 10 टक्क्याने वाढतोय, हा स्टॉक खरेदीदारांच्या हिटलिस्टवर

Stock In Focus

Stock In Focus | मागील आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीत गुंतवणूकदारांनी अप्रतिम कमाई केली आहे. गुंतवणुकदारांना भरघोस परतावा मिळवुन देणारे अनेक स्टॉक आहेत, मात्र CL Educate या कंपनीच्या शेअरने लोकांना मालामाल केले आहे. हा स्टॉक अशा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे ज्यांने एका वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कंपनीने 2022 या चालू वर्षात आतापर्यंत 43.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. भरघोस परतावा दिल्यानंतर आता ‘सीएल एज्युकेट’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स इश्यूसाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.

बोनसची रेकॉर्ड डेट :
सीएल एज्युकेट कंपनीने बोनस शेअर्स जारी करण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. ‘सीएल एज्युकेट’ कंपनीने स्टॉक मार्केट नियामकला कळवले आहे की,” CL Educate कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकताच पार पडली होती, ज्यात संचालकांनी 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या प्रति एक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 16 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे”. म्हणजेच 16 डिसेंबर 2022 पर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील असेल, त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स देईल.

स्टॉकमध्ये 10 टक्के अपर सर्किट :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच 6 डिसेंबर 2022 रोजी CL Educate कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. 10 टक्के अप्पर सर्किटसह सीएल एज्युकेट कंपनीचे शेअर 169.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तथापि त्यानंतर शेअर्समध्ये थोडी घसरण पहायला मिळाली आणि स्टॉक बीएसई निर्देशांकावर 164.90 रुपये किमतीवर आला होता. सीएल एज्युकेट कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 28.16 टक्क्यांनी वधारले आहेत. दुसरीकडे मागील 1 महिन्यापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी आतापर्यंत 10.98 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 190 रुपये आहे, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 97 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| CL Educate Company Stock In Focus of Stock Market expert for investment for earning high returns on 07 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x