29 March 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

PPF Scheme | पीपीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास पैशाचे काय होते? कोणाला अधिकार मिळतात?, वाचा पूर्ण माहिती

 PPF Scheme

PPF Scheme | सध्याच्या महागाईच्या काळात लोक तुटपुंज्या पगारावर काम करतात, आणि त्यातून शक्य तेवढे खर्च कमी करून पैसे बचत करतात. ठराविक पगार असणारे लोक आपल्या कमाईतून काही पैसे बचत करून चांगला परतावा मिळवण्यासाठी विविध योजनांमध्ये गुंतवतात. त्यामागील त्यांचा हेतू आपले आर्थिक जीवन सुरक्षित करण्याचा असतो. लोकं आपले सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक जीवन सुरक्षित करण्यासाठी पीपीएफ योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. जर समजा असा वेळी खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या PPF मधील पैशाचे काय होते? चला तर मग जाणून घेऊ

PPF योजनेत गुंतवणुकीवर भारत सरकार परतावा मिळण्याची हमी देते. आणि या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमची गुंतवणूक ही सुरक्षित राहते. PPF योजनेत गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. हा व्याज परतावा दर केंद्र सरकारतर्फे निश्चित केला जातो. PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. आणि तुम्ही पीपीएफ खाते मुदतीपूर्वी बंद करू शकता.

मॅच्युरिटीपूर्वी पीपीएफ खात्यातून पैसे काढता येतात?
PPF योजनेचे खातेधारक आरोग्य आणि शैक्षणिक आपत्कालीन परिस्थितीत योजनेची मुदत पूर्ण होण्याआधी आपले पैसे काढू शकतात. खातेधारक NRI असल्यास, PPF खाते उघडल्याच्या तारखेपासून किमान 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते आपले खाते बंद करू शकतात. मात्र त्यावर 1 टक्के व्याज दंड शुल्क म्हणून कापले जाईल.

खातेदाराचा मृत्यू झाल्यावर गुंतवणूक केलेल्या पैशाचे काय होते?
जर समजा एखादा व्यक्ती PPF योजनेत गुंतवणूक करत असले, पण योजनेच्या मॅच्युरिटीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची वारस किंवा नॉमिनी व्यक्ती PPF मधून पैसे काढू शकते. अशा परिस्थितीत कालावधीचे कोणतेही बंधन नसते. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याचे PPF खाते बंद केले जाते. शिल्लक रक्कम व्याज परतावासह नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला दिली जाते

चक्रवाढ व्याज परतावा :
PPF योजनेतील व्याजदर केंद्र सरकार दर तिमाहीत निश्चित करत असते. या योजनेत गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो. सध्या PPF योजनेत गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के व्याज परतावा दिला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Investment what Happens with money in PPF account under PPF Scheme if Person dies on 01 April 2023.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x