
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या पटेल इंजिनिअरिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या टेक्निकल चार्टमध्ये मजबूत तेजीचे संकेत पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसने पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सवर ‘पिक ऑफ द मंथ’ घोषित केले आहे. ( पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील एका महिन्यात मजबूत कमाई करून देऊ शकतात. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 0.50 टक्के वाढीसह 59.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आनंद राठी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस फर्मने पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 66 रुपये किमतीवर जाऊ शकतात. 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 12-15 टक्के वाढू शकतात.
तज्ञांनी पटेल इंजिनिअरिंग स्टॉकवर पैसे लावताना 53 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स फक्त 19 टक्के वाढले आहेत. 2024 या वर्षात पटेल इंजिनिअरिंग स्टॉकने लोकांना 10 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.
पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. मागील 5-6 ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने मजबूत वाढीचे संकेत दिले आहेत. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव कमी राहण्याची अपेक्षा आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 56-58 रुपये दरम्यान गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत 66 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.