
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 73.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
नुकताच पटेल इंजिनीअरिंग कंपनीला तेलंगणा राज्यात 525.36 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी पटेल इंजिनीअरिंग स्टॉक 0.85 टक्के घसरणीसह 70.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नुकताच पटेल इंजिनीअरिंग कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, तेलंगणा सरकारच्या पाटबंधारे आणि CAD विभागाने पटेल इंजिनीअरिंग कंपनीला 525.36 कोटी रुपये मूल्याचे बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी लावणारी कंपनी म्हणून घोषित केले आहे. या कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, हा प्रकल्प कराराच्या तारखेपासून 24 महिन्यांच्या आत पूर्ण केला जाईल. या घोषणेनंतर पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 2.62 टक्के उसळी पाहायला मिळाली होती.
पटेल इंजिनिअरिंग या कंपनीला 74 वर्षाचा व्यावसायिक अनुभव आहे. ही कंपनी जलविद्युत आणि धरण प्रकल्पांसाठी बोगदा आणि भूमिगत काम करण्यात एक्स्पर्ट मानली जाते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.10 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,477.98 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.