9 May 2025 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | युद्धाचे ढग, डिफेन्स कंपनी शेअर्स तेजीत, मिळेल मोठा परतावा - NSE: MAZDOCK Apollo Micro Systems Share Price | झुंबड हा स्टॉक खरेदीला; मल्टिबॅगर शेअरने अप्पर सर्किट हिट केला - NSE: APOLLO Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअरची ही असेल पुढची टार्गेट, या अपडेटचा होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स शेअर देऊ शकतो 23 टक्केपर्यंत परतावा, महत्वाची अपडेट आली - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले, येस बँक शेअर्स रॉकेट तेजीत, अपडेट नोट घ्या - NSE: YESBANK Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL
x

Paytm Share Price | पेटीएम कंपनीची वाटचाल प्रॉफिटेबल होण्याच्या दिशेने, शेअरवर नवीन टार्गेट प्राईस पहा

Paytm Share Price

Paytm Share Price | मार्च 2023 च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होण्यापूर्वी ‘पेटीएम’ ची मूळ कंपनी ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, शेअर बाजारातील तज्ञ देखील ‘पेटीएम’ स्टॉकबाबत तेजीचा अंदाज व्यक्त करत आहेत. या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. व्यवहारादरम्यान ‘पेटीएम’ शेअरने 663.50 रुपये किंमत स्पर्श केली होती. आज मंगळवार दिनाक 11 एप्रिल 2023 रोजी ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 658.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (One 97 Communications Ltd)

‘पेटीएम’ स्टॉकवर तज्ञ काय म्हणतात? :
ब्रोकरेज फर्म ‘येस सिक्युरिटीज’ ने ‘पेटीएम’ स्टॉकवरील लक्ष्य किमतीत बदल केला आहे. ब्रोकरेज फर्मने ‘पेटीएम’ स्टॉकवर 700 रुपये शॉर्ट टर्म टार्गेट किंमत जाहीर केली आहे. या संदर्भात हा स्टॉक पुढील अल्प काळात 7 टक्के वाढू शकतो, असे तज्ञांना वाटते. येस सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पेटीएम कंपनीच्या उत्पन्नात मजबूत वृध्दी झाली आहे. कर्ज वितरणात ही कंपनीने चांगली वाढ नोंदवली आहे. कंपनीचे कामकाजातून मिळणारे उत्पन्नही चांगल्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘येस सिक्युरिटीज’ फर्मच्या मते, ‘पेटीएम’ कंपनी आता फायदेशीर होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत ‘पेटीएम’ कंपनीने 2,062 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. महसुलात 42 टक्के वाढ मार्च तिमाहीच्या अपेक्षांना आणखी बळकटी देत आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका महिन्यात Paytm कंपनीच्या शेअरची किंमत 13.44 टक्के वाढली आहे. तर 2023 मध्ये ‘पेटीएम’ कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. ‘पेटीएम’ कंपनीचा IPO नोव्हेंबर 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO साठी स्टॉकची इश्यू किंमत 2150 रुपये जाहीर केली होती. ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यापासून आपल्या इश्यू प्राईसवर पोहोचले नाहीये.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price on 11 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या