
Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअर्सने आता 800 रुपये किमतीचा पल्ला पार केला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 809.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही 6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
पेटीएम कंपनीचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी तुफानी तेजीत ट्रेड करत होते. पेटीएम स्टॉकमध्ये ही अचानक वाढ रेटिंग अपग्रेडमुळे पाहायला मिळाली आहे. पेटीएम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 439.60 रुपये होती. शुक्रवार दिनांक 9 जून रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 813.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शेअरचे सविस्तर तपशील
बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात पेटीएम कंपनीच्या शेअर्सची रेटिंग अपग्रेड केली आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज फर्मने विश्वास व्यक्त केला आहे की, रिस्क पुरस्कार पेटीएम स्टॉक अधिक सकारात्मक झाला आहे.
ब्रोकरेज हाऊस बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने आता पेटीएम शेअर्सची रेटिंग न्यूट्रलवरून अपग्रेड केली आहे. तसेच तज्ञांनी पेटीएम कंपनीच्या शेअर्सवर 885 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. यापूर्वी तज्ञांनी पेटीएम स्टॉकवर 780 रुपये लक्ष किंमत निश्चित केली होती. तज्ञांच्या मते पेटीएम स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
शेअरमध्ये 70 टक्के वाढ
मागील 6 महिन्यांत पेटीएम कंपनीचे शेअर्स 70 टक्के मजबूत झाले आहेत. 23 डिसेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 476.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पेटीएम कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 9 जून रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 809.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
या वर्षी आतापर्यंत पेटीएम कंपनीचे शेअर्स 53 टक्के मजबूत झाले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 532.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 809.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. पेटीएम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 844.70 रुपये होती. तर पातळी किंमत 438.35 रुपये होती.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.