20 May 2024 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell?
x

Greenlam Industries Share Price | ग्रीनलॅम इंडस्ट्रीज शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला, स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ का? कारण जाणून घ्या

Highlights:

  • Greenlam Industries Share Price
  • स्टॉक वाढीचे सविस्तर कारण
  • इतर तपशील
Greenlam Industries Share Price

Greenlam Industries Share Price | ग्रीनलॅम इंडस्ट्रीज या लॅमिनेट बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी 20 टक्क्यांच्या वाढीसह 483.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे.

ग्रीनलॅम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने तमिळनाडूतील टिंडीवनम येथील प्लायवूड आणि सहयोगी उत्पादनांच्या युनिटमध्ये व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रीनलॅम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स अचानक तेजीत आले आहेत.

स्टॉक वाढीचे सविस्तर कारण

ग्रीनलॅम इंडस्ट्रीज कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीने 9 जून 2023 पासून वार्षिक 18.9 दशलक्ष चौरस मीटर स्थापित क्षमता असलेल्या उत्पादन प्रकल्पातव्यावसायिक उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. पूर्ण क्षमतेचा वापर करून कंपनी या प्लांटमधून वार्षिक 400 कोटी रुपये महसूल मिळवू शकते. ग्रीनलॅम इंडस्ट्रीज कंपनीने आपली उपकंपनी HG इंडस्ट्रीज मार्फत प्लायवूड आणि संबंधित उत्पादने बनवण्याचा ग्रीनफिल्ड प्रकल्प 125 कोटी रुपये गुंतवणूक करून निर्माण केला आहे.

इतर तपशील

ग्रीनलॅम इंडस्ट्रीज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनी आंध्र प्रदेशातील नायडूपेटा येथील ग्रीनफिल्ड लॅमिनेट प्लांट आणि पार्टिकल बोर्ड प्लांटमध्ये आर्थिक वर्ष 2023-2024 च्या Q2 आणि Q4 मध्ये उत्पादन सुरू करणार आहे. ग्रीनलॅम कंपनी जगातील टॉप 3 लॅमिनेट उत्पादकांपैकी एक मानली जाते.

ग्रीनलॅम लॅमिनेट, नुमिका लॅमिनेट, डेकोवुड व्हेनिअर्स, मिकासा फ्लोअर्स, मिकासा डोअर्स आणि फ्रेम्स हे कंपनीचे प्रसिद्ध ब्रँड म्हणून ओळखले जातात. ग्रीनलॅम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 58 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Greenlam Industries Share Price today on 10 June 2023.

हॅशटॅग्स

Greenlam Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x