20 April 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Paytm Share Price | पेटीएम शेअर'मध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, काय म्हटलं तज्ज्ञांनी जाणून घ्या

Paytm Share Price

Paytm Share Price | टेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड कंपनी पेटीएमचे शेअर्स भांडवली बाजारात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. लोकांनी खूप विश्वास दाखवून पैसा गुंतवला, पण हवा तसा परतावा येऊ शकला नाही. पैसे गुंतवल्यानंतर शेअर्स ची कामगिरी पाहून अनेक गुंतवणूकदार निराश झाले. पेटीएम ही One97 या कंपनीची डिजिटल वित्तीय सेवा देणारी एक शाखा आहे. मागील वर्षी One97 या कंपनीचा IPO शेअर बाजारात सूचिबद्ध झाला होता. पण विविध कारणांमुळे आणि व्यवस्थापन कमतरतेमुळे या स्टॉकची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे भागधारक दीर्घकाळापासून शेअरची किमत वाढण्याची वाट पाहत आहेत. आता त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.

JP Morgan चे Paytm वर मत :
विदेशी ब्रोकरेज फर्म JP Morgan ने पेटीएमच्या शेअर्सवर ओव्हरवेट रेटिंग दिली आहे. यासोबतच JP Morgan ने पेटीएमच्या शेअरसाठी 1000 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. JP Morgan च्या या सकारात्मक रेटिंगमुळे गुंतवणूकदारांना आणि शेअर बाजारातील तज्ञांना पेटीएमच्या शेअर्समध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे. JP Morgan फर्म पेटीएमच्या शेअर्स बाबत अत्यंत सकारात्मक असून त्यांनी ह्या स्टॉक मध्ये पुढील काळात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे पेटीएमसाठी JP morgan ने जे लक्ष निर्धारित केले आहे, ते सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा 57 टक्के जास्त आहे. 29 सप्टेंबर रोजी JP Morgan या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाऊसने आपल्या अहवालात म्हटले होते की, “पेटीएम आपले व्यवसाय मॉडेल बदल्यास इच्छुक आहे, आणि कंपनीला कोणत्याही परिस्थतीत व्यापार बस्तर करायचा आहे, यामुळे आता कंपनीचे लक्ष फक्त जास्तीत जास्त फायदा कमावण्यावर असेल”.

ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनच्या मते, सप्टेंबर 2022 पासून पेटीएम आपले खर्च कमी करण्याचा प्रयत्न करेल,ज्यामुळे कंपनीच्या नफ्यात सुधारणा होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किमतीवर होईल. याशिवाय, कंपनी प्रोत्साहन उत्पन्न, को-ब्रँड क्रेडिट कार्ड जारी करणे आणि संभाव्य UPI P2M मधून आपले प्रॉफिट मार्जिन वाढवू शकते. JP Morgan च्या मते, पेटीएमचे एकूण मार्जिन 60 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

एका महिन्यात 12 टक्के घसरण :
पेटीएमचा स्टॉक एका महिन्यात 12 टक्क्यांहून अधिक पडला आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, पेटीएमचा स्टॉक 0.92 टक्के वाढीसह 637.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका महिन्या पेटीएमचा स्टॉक 12 टक्केपेक्षा अधिक पडला आहे. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाऊस JP Morgan च्या सकारात्मक अहवालानंतर गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. कंपनीला अपेक्षा आहे, की स्टॉक विकून बाहेर पडलेले गुंतवणूक त्यांच्याकडे परत येतील.

Paytm बद्दल थोडक्यात :
पेटीएम ही एक भारतीय ई-कॉमर्स डिजिटल पेमेंट सिस्टम आहे. पेटीएमच्या मूळ कंपनीचे नाव One 97 आहे असून त्याची स्थापना 2010 साली होती. सुरुवातीला पेटीएम कंपनी मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज सेवा पुरवत होती, नंतर कंपनीने जबरदस्त विस्तार केला आणि सध्या पेटीएम भारतातील मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनी पैकी एक आहे. पेटीएम कंपनीचे मुख्यालय उत्तर प्रदेश राज्यात नोएडा येथे आहे. पेटीएम आपल्या ॲपद्वारे डिजिटल पेमेंट,वीज बिल, गॅस बिल तसेच रिचार्जिंग आणि क्रेडिट कार्ड बिल भरण्याची सेवा सुविधा प्रदान करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Paytm share Price will Increase as per JP Morgan’s Latest Report Stock Market on 1 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x