14 September 2024 8:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा

Highlights:

  • PCBL Share Price 
  • 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा
  • पीसीबीएल शेअर्सचा ट्रेण्ड
  • पीसीबीएल कंपनीच्या व्यवसायात सकारात्मक वाढ होईल
PCBL Share Price

PCBL Share Price | पीसीबीएल कंपनीच्या शेअरमध्ये एप्रिल 2023 पासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 8.96 टक्के मजबूत झाले आहेत. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 137.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 21 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 80 हजार रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते पीसीबीएल स्टॉक पुढील काळात 180 रुपये पर्यंत वाढू शकतो. म्हणजेच सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 31 टक्क्यांनी वाढू शकतो.

77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा

पीसीबीएल कंपनीचे शेअर्स 24 मे 2002 रोजी 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून यात 13010 टक्क्यांची वाढ झाली असून स्टॉक आज 137.65 रुपये पर्यंत पोहचला आहे. म्हणजेच मागील 21 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये ज्या लोकांनी 77 हजार रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत.

13 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 95.30 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 16 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक 153.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. मागील तीन महिन्यांत शेअरची किंमत 61 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र सध्या शेअरची किंमत उच्चांक किंमत पातळीपासून 10 टक्क्यांनी वाढली आहे.

पीसीबीएल शेअर्सचा ट्रेण्ड

पीसीबीएल ही कंपनी मुख्यतः कार्बन ब्लॅक बनवण्याचे काम करते. याचा वापर टायर्समध्ये मजबुतीकरण सामग्री म्हणून केला जातो. कंपनीची 9 टक्के विक्री स्पेशॅलिटी कार्बन ब्लॅकमधून येते. यात उच्च मार्जिन आहे. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टनुसार, पीसीबीएल कंपनी निरोगी मार्जिन प्रोफाइल आणि भांडवल कार्यक्षम व्यवसाय मॉडेल चालवत आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा प्रति टन नफा 18 टक्क्यांच्या वाढीसह 29,234 रुपये प्रति टनवर पोहचला आहे.

पीसीबीएल कंपनीच्या व्यवसायात सकारात्मक वाढ होईल

पीसीबीएल कंपनीच्या मते,ऑटो विक्रीतील सुधारणा, यूएस आणि युरोप सारख्या प्रमुख विकसित बाजारपेठेतील पुरवठा साखळीच्या समस्यांचे निराकरण झाल्याने, आणि आगामी तिमाहीत आर्थिक क्रियाकलाप पुन्हा रुळावर आल्याने यातून कंपनीच्या व्यवसायात सकारात्मक वाढ होईल.

या घटकांच्या आधारे, ICICI डायरेक्टने पीसीबीएल स्टॉकवर 180 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तर IDBI कॅपिटलच्या मते, मार्च तिमाहीतील विक्रीचे आकडे त्याच्या अंदाजाच्या तुलनेत कमी आहेत. म्हणून IDBI Capital फर्मने पीसीबीएल स्टॉकवर 152 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PCBL Share Price today on 02 June 2023.

हॅशटॅग्स

#PCBL Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x