14 December 2024 3:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Sachin Pilot | सचिन पायलट नवीन पक्ष स्थापन करणार, काँग्रेसला आधीच मिळाली होती माहिती, अधिक महत्व न देता 'उपाय' केला

Rajasthan Sachin Pilot

Sachin Pilot | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात प्रचंड राजकीय वाद सुरू आहे. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारावरून कारवाईसह अन्य अनेक मागण्यांवर सचिन पायलट ठाम आहेत. नुकतेच गेहलोत आणि सचिन पायलट देखील काँग्रेस हायकमांडसमोर हजर झाले होते, त्यानंतर सर्व काही ठीक झाल्याचा दावा करण्यात आला.

काँग्रेसला आधीच याची माहिती मिळाली होती
मात्र, हे अर्धसत्य आहे. खरं तर येत्या काळात पायलट राजस्थानच्या राजकारणात मोठा धमाका करू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, पायलट या महिन्यात नवा पक्ष स्थापन करू शकतात. मात्र त्याचा राजस्थानच्या राजकारणात विशेष फरक पडणार नाही असं स्थानिक राजकीय विश्लेषक सांगत आहेत. काँग्रेसला आधीच याची माहिती मिळाली होती की सचिन पायलट हे IPAC प्रमुख प्रशांत किशोर यांच्या संपर्कात असून तेच त्यांच्यासाठी प्रचारावेळी इव्हेन्ट करत होते. त्यामुळे काँग्रेसने स्वतःहून ते बाहेर पडावेत यासाठी अधिक हालचाल केली नाही.

सचिन पायलट यांच्या समर्थकांचा आकडा ४-५ आमदारांच्या वर नाही
कारण त्यांच्या एकूण राजकीय हालचाली काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना लक्ष करण्यावर होत्या. मात्र राजस्थान काँग्रेसमध्ये त्यांच्या समर्थकांचा आकडा ४-५ आमदारांच्या वर नाही. अशोक गहलोत यांच्या सरकारला त्याने कोणताही धोका उध्दभवणार नाही. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना अधिक संधी मिळेल असं म्हटलं जातंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र सचिन पायलट याचे असलेले ४-५ समर्थक आमदारही त्यांना सोडतील असं म्हटलं जातंय.

राजकीय संकटात अडकलेल्या प्रशांत किशोर यांच्या कंपनीची मदत
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या आयपॅकचा वापरही सचिन पायलट करत आहेत. ‘आयपॅक’ ही प्रशांत किशोर यांची कंपनी असून, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार आदी राज्यांत अनेक पक्षांना निवडणुका जिंकण्यास मदत केली आहे. मात्र प्रत्येक वेळी त्यांना यश मिळालंच असं नाही. राजकीय पक्षात प्रवेश करणारे प्रशांत किशोर आज स्वतःच राजकीय संकटात आहेत. दरम्यान, सचिन पायलट यांनी आपला हेतू स्पष्ट केल्याचा दावा न्यूजलॉन्ड्रीच्या वृत्तात करण्यात आला आहे. आयपॅकच्या एका वरिष्ठ सूत्राने न्यूजलॉन्ड्रीला सांगितले की, पायलट यांनी काही काळापूर्वीच आमच्याकडून पेड सेवा घेतली होती आणि पायलट दोन ते तीन आठवड्यांत स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करतील.

सचिन पायलट यांचा राजकीय हेतू काँग्रेसला आधीच समजला होता. मात्र संपूर्ण राज्यात सचिन पायलट यांच्याकडे पक्ष संघटन आणि त्यादर्जाचे पदाधिकारी नसल्याचं समजतं. तसेच अशोक गेहलोत फॅक्टर राजस्थानमध्ये प्रचंड मोठा आणि महत्वाचा असल्याचं काँग्रेसला माहिती असल्याने त्यांनी सचिन पायलट हे स्वतःच कसे बाहेर जातील यासाठी मार्ग करून देण्याच्या हेतून सचिन पायलट यांना जास्त किंमत दिली नाही. त्यामुळे सचिन पायलट अधिकच राजकीय कात्रीत अडकले आहेत असं म्हटलं जातंय.

आयपॅकशी संबंधित इतर दोघांनीही सचिन पायलट यांना त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यास मदत करत असल्याची पुष्टी केली आहे. या दोघांपैकी एक माजी कर्मचारी तर एक सध्याचा कर्मचारी आहे. सचिन पायलट यांच्यासोबत सध्या ‘आयपॅक’चे १०० जण काम करत आहेत. आणखी ११०० जणांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही त्यांना नव्या पक्षासाठी नावे सुचवली आहेत. सचिन पायलट जूनमध्येच आपल्या नव्या पक्षाची घोषणा करू शकतात, असा ही दावा करण्यात आला आहे. ते नवा पक्ष सुरू करतील याची आम्हाला खात्री पटली नसती, तर एवढ्या लोकांना आम्ही पैसे देऊन कामावर घेतले नसते, असे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, राजस्थान विधानसभा निवडणूक विजयाच्या ध्येयाने एकजुटीने लढविणार असल्याचे काँग्रेसने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच राजस्थान मधील काँग्रेसचे आमदार मात्र सचिन पायलट स्वतःच बाहेर गेल्याने आता आनंद व्यक्त करत आहेत. तसेच आता काँग्रेस त्यांना चोख प्रतिउत्तर देण्यास सज्ज होईल असं म्हटलं जातंय.

News Title : Rajasthan Sachin Pilot may form a new political party with the help of I-PAC check details on 03 June 2023.

हॅशटॅग्स

#Rajasthan Sachin Pilot(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x