22 June 2024 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

मराठी व्यक्ती होणार सरन्यायाधीश; रंजन गोगोईंनी केली शिफारस

CJI, Supreme Court of India, Ranjan Gogoi, Justice Bobde

नवी दिल्ली : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची सुप्रीम कोर्टाच्या पुढील सरन्यायाधीश पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. सीजेआयचे न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी पुढील सरन्यायाधीशांसाठी केंद्र सरकारला पत्र लिहलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश बोबडे हे १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती बोबडे हे ४७ वे मुख्य सरन्यायाधीश असतील. २३ एप्रिल २०२१ पर्यंत न्यायमूर्ती बोबडे सरन्यायाधीश पदी असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती. आता ते १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे परंपरेनुसार आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ असलेल्या न्यायाधीश बोबडे यांची शिफारस त्यांनी सरन्यायाधीश पदासाठी केली आहे.

२४ एप्रिल १९५६ रोजी नागपुरात जन्मलेले न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे १९७८ मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून सराव सुरू केला. १९९८ मध्ये त्यांना वरिष्ठ वकील करण्यात आले. मार्च २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x