
Penny Stocks List | रोलाटेनर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षापासून आपल्या शेअर धारकांना जबरदस्त दणका दिला आहे. मागील 6 वर्षातब्या कंपनीचे शेअर्स 19.20 रुपये किमतीवरून घसरून 1.80 रुपये रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या कालावधीत ज्या लोकांनी या स्टॉकवर एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता फक्त 11000 रुपये राहिले आहेत. गुंतवणूकदारांना तब्बल 89,000 रुपयांचा तोटा झाला आहे. (Penny Stock List)
मात्र सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रोलाटेनर्स लिमिटेड स्टॉकमध्ये अचानक 20 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी रोलाटेनर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.25 टक्के घसरणीसह 1.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची कामगिरी
मागील 5 दिवसात रोलाटेनर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 25.00 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 1 मार्च 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 0.85 पैसे ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर या शेअरची उच्चांक किंमत पातळी 1.80 रुपये होती. रोलाटेनर्स लिमिटेड ही कंपनी 1968 साली स्थापन झाली होती. ही कंपनी मुख्यतः पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करणारी स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43.77 कोटी रुपये आहे.
कंपनीची आर्थिक कामगिरी
आर्थिक वर्ष 2022-2023 संपलेल्या तिमाहीमध्ये रोलाटेनर्स लिमिटेड कंपनीने 1.22 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जर तुम्ही रोलाटेनर्स कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, 25 नोव्हेंबर 2016 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 जानेवारी 2017 रोजी हा स्टॉक 19.20 रुपये किमतीवर पोहचला होता.
23 जून 2017 रोजी रोलाटेनर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 एप्रिल 2020 रोजी हा स्टॉक 1.05 रुपये पर्यंत खाली घसरला होता. त्यानंतर स्टॉकमध्ये किंचित तेही आली आणि, 8 जानेवारी 2021 रोजी रोलाटेनर्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक 4.30 रुपयेवर पोहोचला, आणि नंतर स्टॉक पुन्हा 1.10 रुपये पर्यंत खाली आला.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.