
Penny Stock | राजेश एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना दीर्घ कालावधीत बंपर परतावा कमावून दिला आहे. हा त्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कोविडनंतरच्या रॅलीमध्ये राजेश एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरची किंमत फेब्रुवारी 2022 पर्यंत 450 रुपयेवरून 994 रुपयेपर्यंत वधारली होती. म्हणजेच फक्त दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे.
शेअरमधील वाढ :
NSE निर्देशांकावर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी गाठल्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली होती. असे असूनही, मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्केचा बंपर परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक 2.10 रुपयेवरून 752 रुपयेपर्यंत वाढला आहे. कंपनीच्या शेअरने मागील दोन दशकांच्या कालावधीत 358 टक्क्यांची बंपर वाढ अनुभवली आहे.
बोनस शेअरचा इतिहास :
गेल्या 21 वर्षांमध्ये या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना एक वेळा बोनस वाटप केले होते. या बोनस शेअर्सचा दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा होता. राजेश एक्सपोर्ट्स कंपनीने जानेवारी 2008 साली एक्स-बोनस डेटवर ट्रेड केला होता. या कंपनीने त्यावेळी आपल्या विद्यमान गुंतवणुकदारांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते. त्यामुळे, ज्या लोकांनी हा स्टॉक 2001 च्या सुरुवातीला खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून तिप्पट झाले आहे.
गुंतवणूकीवर मिळालेला परतावा :
जर तुम्ही जुलै 2001 रोजी राजेश एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 1 लाख रुपये लावून 2.10 रुपये प्रति शेअर्स या किमतीवर घेतले असते तर तुम्हाला एकूण 47,619 शेअर्स मिळाले असते. 2008 या वर्षात राजेश एक्सपोर्ट्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते. म्हणजेच, गुंतवणूकदारांच्या एकूण शेअर्सची संख्या 1,42,857 झाली असती. सध्या राजेश एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर 752 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. याचा सध्याच्या ट्रेडिंग किमतीनुसार गुंतवणूकदारांच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य वाढून 10,74,28,464 रुपये म्हणजेच 10.74 कोटी रुपये झाले असते. त्यामुळे, राजेश एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर मध्ये ज्याने 1 लाख रुपये लावले होते, त्याला मागील 21 वर्षांत 10.74 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.