27 March 2023 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही   Raymond Share Price | रेमंड शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, स्टॉकची टार्गेट प्राईस पहा
x

Penny Stock | मार्ग श्रीमंतीचा, स्टॉक मार्केट का छोटा रिचार्ज! या 1 रुपये 31 पैशाच्या शेअरने 1 लाखाचे 65 लाख केले, नोट करा हा स्टॉक

Multibagger Stock

Penny Stock | जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ-उताराचे चक्र सुरू आहे. पण इतर देशातील शेअर बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार अजूनही चांगली कामगिरी करत आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्याचे शेअर्स ट्रेड करत आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत ‘सनमीत इन्फ्रा’ या कंपनीच्या शेअरचे नाव देखील सामील झाले आहे अवघ्या 4 वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर्स पेनी स्टॉक म्हणून ओळखले जात होते, आणि या कंपनीच्या शेअरने मागील काळापासून आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांची आकडेवारी पहिली तर तुम्हाला समजेल की या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 5,365 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मनीकंट्रोलने नुकताच एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केले होते, त्यानुसार अलीकडेच ‘सनमीत इन्फ्रा’ या कंपनीने आपले स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिट अंतर्गत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे विभाजन 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबर 2022 रोजी हा मल्टीबॅगर स्टॉक एक्स-स्प्लिटवर ट्रेड करत होता. 17 नोव्हेंबर 2022 रोजी.या कंपनीचे शेअर्स 85.70 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर हा शेअर किंचित वाढीसह 71.40 रुपयांवर ट्रेड करत होता.

सनमीत इन्फ्राचा मल्टीबॅगर परतावा :
हा स्टॉक आज अल्प वाढीसह NSE इंडेक्सवर 71.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या स्टॉकने मागील 6 महिन्यांत 75 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्यामुळे 2022 मध्ये या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 139.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. Sanmeet Infra कंपनीच्या शेअर्सने फक्त एका वर्षात लोकांना 214 टक्के नफा कमावून दिला आहे. तसेच मागील 5 वर्षात गुंतवणूकदारांनी या स्टॉकच्या माध्यमातून 5,365 टक्के नफा कमावला आहे.

1 लाखावर दिला 65 लाख परतावा :
21 डिसेंबर 2018 रोजी ‘सनमीत इन्फ्रा’ कंपनीचे शेअर 1.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या शेअरची किंमत 85.70 रुपये पर्यंत पोहोचली आहे. जर तुम्ही चार वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 65 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही या मल्टीबॅगर कंपनीच्या स्टॉकमध्ये एक वर्षभरापूर्वी पैसे लावले असते, तर आज तुमची गुंतवणूक तिप्पट झाली असती, आणि गुंतवणुकीचे मूल्य वाढून 314,172 रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Sanmeet Infra share price return on investment on 24 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(545)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x