8 October 2024 9:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News
x

Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 6 शेअर्स विकत घेता येतील, हा पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल करतोय

Penny Stocks

Penny Stocks | अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 2.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 107 कोटी रुपये आहे. अॅडविक कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.90 रुपये होती. 4 नोव्हेंबर 2020 रोजी अॅडविक कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28 पैशांवर ट्रेड करत होते. | Advik Capital Share Price

ज्या लोकांनी या किमतीवर अॅडविक कॅपिटल स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 900 टक्के वाढले आहे. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी अॅडविक कॅपिटल स्टॉक 2.91 टक्के वाढीसह 2.47 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

अॅडविक कॅपिटल लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, त्यांनी भांडवल उभारण्यासाठी एक नवीन योजना आखली आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीने SEBI कडे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड श्रेणी-II च्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडाच्या माध्यमातून कंपनी 250 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. या भांडवलाच्या माध्यमातून कंपनी व्यवसाय विस्तार करण्याचा प्रयत्न करेल.

मागील 2 वर्षांत अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 29 पैशांवरून वाढून 5 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 2 वर्षांत अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1350 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 2 वर्षांपूर्वी अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये 100,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 15 लाख रुपये झाले आहे.

अॅडविक कॅपिटल ही कंपनी एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक आणि इतर कॉर्पोरेट भाडेपट्टीवर सल्ला देण्याचे काम करते. या कंपनीचा ग्राहक वर्ग भारतातच नाही तर जगभरात पसरला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Advik Capital Share Price 02 December 2023.

हॅशटॅग्स

#Advik Capital Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x