
Penny Stocks | शेअर बाजार जबरदस्त तेजीत असताना गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 9.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 85 कोटी रुपये आहे. East West Holdings Share Price
ईस्ट वेस्ट होल्डिंग्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 7.51 रुपये होती. दोन दिवसांत या कंपनीचे शेअर्स 6.67 रुपयेवरून वाढून 9.61 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या अल्पावधीत गुंतवणूकदारांनी पैसे लावून 40 टक्के नफा कमावला आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.89 टक्के वाढीसह 10.56 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 16.47 टक्के वाढीसह 6.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्सने 10.56 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 62 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 92 टक्के वाढली आहे. 12 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.37 रुपये या नीचांकी किमतीवर ट्रेड करत होते. 29 जुलै 2016 रोजी ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.15 रुपये या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 210 टक्के मजबूत झाले आहेत.
ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या माल हाताळणी आणि मालवाहतुकीसाठी लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा एकच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय करते. ईस्ट वेस्ट होल्डिंग्ज कंपनी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाद्वारे समर्थित सर्वोत्तम सानुकूलित लॉजिस्टिक सोल्यूशन्स प्रदान करण्यात अग्रणी मानली जाते.
या कंपनीच्या सर्व सेवामध्ये रस्ते वाहतूक, हवाई मालवाहतूक अग्रेषित ऑपरेशन्स आणि सागरी फ्रेट फॉरवर्डिंग ऑपरेशन्स सेवा देखील सामील आहेत. ही कंपनी तिच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी ईस्ट वेस्ट फ्रेट कॅरियर्स लिमिटेड मार्फत देखील विविध व्यवसाय करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.