 
						Penny Stocks | आठवडी मुदत संपण्याच्या दिवशी (२ मार्च) शेअर बाजारात विक्री दिसून आली. गुरुवारी आयटी, ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली, तर रियल्टी आणि पीएसई शेअर्समध्ये खरेदी झाली. त्याचवेळी एफएमसीजी आणि इन्फ्रा शेअर्सवर दबाव दिसून आला. व्यवहाराअंती बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 501.73 अंकांनी म्हणजेच 0.84 टक्क्यांनी घसरून 58,909.35 वर बंद झाला. तर एनएसईचा निफ्टी 129.00 अंकांनी घसरून 17,321.90 अंकांवर बंद झाला. मागील सत्रात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 448.96 अंकांनी वधारून 59,411.08 वर बंद झाला होता. निफ्टी 146.95 अंकांनी वधारून 17,450.90 टक्क्यांवर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी एक लाख कोटी रुपये गमावले
बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप २,६०,९३,०७६ कोटी रुपयांवरून २,५९,९५,४७४ कोटी रुपयांवर आले, म्हणजे गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
पेनी शेअर्सची जादू:
मार्केट कोसळत असताना देखील काही अत्यंत स्वस्त किंमतीचे पेनी शेअर्स मात्र प्रतिदिन ५ ते १० टक्के परतावा प्रतिदिन देत आहेत. या शेअर्सनी मागील महिन्याभरात शेकडो टक्क्याने परतावा दिला आहे आणि तोच कल कायम आहे. प्रतिदिन मिळणाऱ्या परताव्याचा आकडा हा बँकेच्या वार्षिक व्याजा इतका आहे. गुरुवारी 02 मार्च रोजी खालील पेनी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाले. आगामी ट्रेडिंग सेशनसाठी या पेनी शेअर्सवर लक्ष ठेवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		