
Penny Stocks | पेनी स्टॉक मिनोल्टा फायनान्स लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर दररोज अप्पर सर्किट करत आहे. गुरुवारी सुद्धा मिनोल्टा फायनान्स शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. सलग सहा दिवस मिनोल्टा फायनान्स कंपनी शेअर अप्पर सर्किट हिट केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिट अँड राईट्स इश्यूला मंजुरी दिल्याने या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. (मीनॉल्टा फायनान्स कंपनी अंश)
स्टॉक स्प्लिट आणि राइट्स इश्यू
मिनोल्टा फायनान्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर विभाजनाला मंजुरी दिली आहे. मिनोल्टा फायनान्स कंपनीकडून १:१० शेअर स्प्लिट जाहीर करण्यात आला आहे. शेअर विभाजनाव्यतिरिक्त संचालक मंडळाने मिनोल्टा फायनान्स कंपनीच्या अधिकृत भागभांडवलात मोठी वाढ करण्यास मान्यता दिली. त्यानंतर अधिकृत भांडवल १०.२ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपयांपर्यंत वाढेल आणि ६० कोटी रुपये होईल, ज्यात ६ कोटी इक्विटी शेअर्सचा समावेश असेल.
मिनोल्टा फायनान्स शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी मिनोल्टा फायनान्स शेअर 4.95 टक्के वाढून 12.93 रुपयांवर पोहोचला होता. मिनोल्टा फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 12.93 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 6.24 रुपये होता. मिनोल्टा फायनान्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 12.9 कोटी रुपये आहे.
मिनोल्टा फायनान्स शेअरने 703 टक्के परतावा दिला
गुरुवार 05 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात मिनोल्टा फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरने 21.29% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 34.83% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात मिनोल्टा फायनान्स शेअरने 78.34% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात मिनोल्टा फायनान्स शेअरने 84.71% परतावा दिला आहे. YTD आधारावर मिनोल्टा फायनान्स शेअरने 79.58% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात मिनोल्टा फायनान्स शेअरने 703.11% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.