
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. Captain Pipes Share Price
आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के वाढीसह 18.83 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. काही तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 25 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
शेअर बाजारातील अनेक गुंतवणूक सल्लागारांनी कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 25 रुपये किमतीसाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ही टार्गेट प्राईस सध्याच्या किमतीच्या तुलनेत 25 टक्के अधिक आहे.
प्लॅस्टिक पाईप क्षेत्रात व्यवसाय संधींचा फायदा घेण्यासाठी कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनी धोरणात्मक योजना आखत आहे. पुढील 2 वर्षांमध्ये या कंपनीचा EBITDA मार्जिन 11 टक्के ते 12 टक्के पर्यंत वाढू शकतो. कच्च्या मालाच्या किमतीतील स्थिरता आणि वितरण नेटवर्कचा विस्तार झाल्यामुळे कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळू शकते.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर 18.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.08 रुपये किमतीवर करत होते. दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 1.48 टक्के घसरणीसह क्लोज झाले होते. मे 2023 मध्ये कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 35.79 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2023 पर्यंत कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 73.78 टक्के भाग भांडवल होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे कंपनीचे 26.22 टक्के भाग भांडवल होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.