
Penny Stocks | आज या लेखात आम्ही तुम्हाला एका स्वस्त स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने फक्त एका वर्षात आपल्या शेअर धारकांना मालामाल बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे,” Filatex Fashions”. या 19 रुपये किमतीच्या स्टॉकने अवघ्या एका वर्षात आपल्या शेअर धारकांना तिप्पट परतावा कमावून दिला आहे. या आठवड्यात शेअर बाजारातील मजबूत तेजीमुळे या कंपनीत ज्या लोकांनी गुंतवणूक एकी होती, त्यां संपत्ती तिप्पट वाढली आहे. ही एक स्मॉलकॅप कंपनी असून या कंपनीच्या शेअर्सनी या आठवड्यात आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी गाठली आहे.
कंपनीच्या शेअरची वाटचाल :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Filatex फॅशन कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 3.47 टक्क्यांच्या वाढीसह 17.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी आदल्या दिवशी 18.15 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली, आणि स्टॉक त्यावेळी 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. मागील वर्षी 4 नोव्हेंबर 2021 रोजी बीएसई निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 4 नोव्हेंबर 2021 रोजी या दिवशी हे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 333.17 टक्के वाढले आहेत. एका आकडेवारीवरून आपण या स्टॉकने दिलेला परतावा मोजू. समजा तुम्ही 4 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 4.33 लाख रुपये झाले असते.
मागील वर्षी 25 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.86 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या सर्वात नीचांकी किंमत पातळीवर गेली होती. Filatex Fashion चे शेअर्स 52 आठवड्यांच्या सर्वात नीचांकी किंमत पातळीवरून सध्या BSE निर्देशांकावर 370.21 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत. या कालावधीत जर तुम्ही 1 लाख रुपये या स्टॉकमध्ये गुंतवले असते, तर तुम्हाला एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 3.70 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळाला असता. तुमच्या गुंतवणुकीसह ही रक्कम 4.70 लाखांहून अधिक झाली असती.
Filatex Fashion कंपनीने 3 नोव्हेंबर 2021 रोजी श्रीलंका स्थित इसाबेला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील 51 टक्के भागभांडवलाचे अधिग्रहण केले. या डीलची बातमी येताच Filatex Fashion कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. इसाबेला प्रायव्हेट लिमिटेड ही श्रीलंकन कंपनी पोशाख आणि संबंधित उत्पादनांची निर्मिती करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये, Filatex Fashion कंपनीने माहिती दिली आहे की, संपलेल्या तिमाहीतील आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी 12 नोव्हेंबर 2022 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, संचालक मंडळाच्या बैठकीत इतर नवीन काही व्यवसायात प्रवेश करण्याच्या मुद्यावर विचार केला जाईल, असे कंपनीने म्हंटले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.