29 April 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Gujarat Toolroom Share Price | लक्ष असुद्या भाऊ! गुजरात टूल रूम शेअरने 1 महिन्यात 70% टक्के परतावा दिला, शेअरची किंमत 22 रुपये

Gujarat Toolroom Share Price

Gujarat Toolroom Share Price | गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअर्सशी संबंधित एक मोठी बातमी सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे. गुजरात टूलरूम ही कंपनी आता दुबई मध्ये आपला व्यवसाय सुरू करणार आहे. ही बातमी येताच गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूल रूम कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 22.14 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी गुजरात टूल रूम स्टॉक 1.98 टक्के वाढीसह 22.58 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 3 महिन्यांत गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 53 टक्के नफा कमावून दिला आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी गुजरात टूलरूम कंपनीचे 11.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून हा स्टॉक 95 टक्के मजबूत झाला आहे.

मागील 6 महिन्यांत गुजरात टूर रूम कंपनीच्या शेअरची किंमत 9.55 रुपयेवरून वाढून 132 रुपये किमतीवर गेली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 2.58 रुपये किमतीवरून वाढून 22.14 रुपये किमतीवर पोहोचली होती. गुजरात टूलरूम स्टॉक 1 ऑक्टोबर 2018 रोजी 73 पैशांवर ट्रेड करत होता, जो आता 2933 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे.

गुजरात टूल रूम कंपनीने नुकताच दुबईच्या बाजारपेठेत व्यवसाय विस्तार करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किमतीवर पाहायला मिळत आहे. गुजरात टूल रूम कंपनीला आता जागतिक आणि उच्च मागणी असलेल्या बाजारपेठेत व्यवसाय वाढवायचा आहे.

गुजरात टूल रूम ही कंपनी मुख्यतः हिरे, मौल्यवान खडे, सोन्याचे डोअर बार आणि दागिन्यांचा व्यवसाय करण्याची घोषणा करत आहे. गुजरात टूलरूम कंपनी दुबईमध्ये व्यवसाय विस्तार करण्यासाठी 50 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gujarat Toolroom Share Price 29 September 2023.

हॅशटॅग्स

Gujarat Toolroom Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x