
Penny Stocks | आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्के वाढीसह 3.52 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राबाबत मोठी घोषणा करण्यात आल्याने आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. ( आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनी अंश )
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशांतर्गत संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या बातमीनंतर शिक्षणाशी संबंधित आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनीचा शेअर तेजीत आला होता. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के वाढीसह 3.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी माहिती दिली की, भारत सरकार दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना थेट ई-व्हाऊचर देणार आहे. ज्यामध्ये कर्जाच्या रकमेवर तीन टक्के व्याज अनुदान दिला जाईल. कौशल्य विकास क्षेत्रासाठी वित्तमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांमध्ये 1,000 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हब अँड स्कोप मॉडेलमध्ये श्रेणीसुधारित करणे, उद्योगांच्या कौशल्याच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची सामग्री संरेखित करणे आणि मॉडेल कौशल्य योजनेत सुधारणा करणे यांचा समावेश आहे.
सरकारी योजना आणि धोरणांतर्गत कोणत्याही लाभासाठी पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी भारत सरकार देशांतर्गत शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी 10 लाख रुपये कर्ज देणार आहे. यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना थेट ई-व्हाऊचर देऊन कर्जाच्या रकमेत तीन टक्के व्याज अनुदान दिले जाणार आहे. मागील 5 दिवसात आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 66 टक्के वाढली आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने वाढत आहेत. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक तब्बल 100 टक्के मजबूत झाला आहे. या काळात हा स्टॉक 1.77 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहचला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.