
Penny Stocks | गेल्या एक महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात हिरवळ पसरलेली पाहायला मिळत आहे. फक्त कर्ज कॅप आणि मिड कॅप नाही तर, स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स देखील आपल्या गुंतवणूकदारांना मल्टी बॅगर परतावा कमावून देत आहेत. अश्याच एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉक ची किंमत 195.45 रुपये प्रती शेअर होती. आणि याच किमतीवर स्टॉकने आपला 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. ह्या भरघोस वाढीमुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात सुमारे 11 टक्के चा भरघोस परतावा मिळाला होता. कंपनीचे नाव आहे ‘जय कॉर्प’. जय कॉर्प कंपनीचे शेअर्स काल जवळपास 9 टक्के वाढीसह 190.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2003 साली मध्ये जय कॉर्पचे शेअर्स फक्त 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअर्सने मागील 19 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 9425 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे 95.22 लाख रुपये झाले असेल.
स्टॉक 48 रुपये वरून गेला 190.50 रुपये पर्यंत :
2020 मध्ये जेव्हा कोरोना चा शिरकाव भासतात झाला होता, त्यावेळी पहिल्या लॉकडाऊन लागू होण्याच्या एक दिवस आधी हा स्टॉक 48 रुपयेच्या खाली पडला होता. आता शेअर्सची किंमत 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 190.50 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक पातळी किमतीवर पोहोचली आहे. तज्ज्ञांच्या मते, जय कॉर्पच्या शेअर्समध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ञांचे मत आहे की, व्हेंचुरा सिक्युरिटीजने या स्टॉकसाठी 225 रुपये ते 575 रुपये लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 3,399.46 कोटी रुपये आहे.
तीन महिन्यांत दिला 93 टक्के परतावा :
जय कॉर्पच्या शेअर्सने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 93 टक्क्यांचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. तर एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 54 टक्केची वाढ झाली आहे. 23 मार्च 2020 रोजी BSE निर्देशांकावर हा शेअर 47.65 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होता. या दरम्यान, कोरोना महामारीमुळे 24 मार्च 2020 पासून देशव्यापी लॉकडाऊन लागू झाल्यापासून 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत शेअर्समध्ये 299.79 टक्केची भरघोस वाढ झाली आहे.
गुंतवणूकदारांना दिला चार पट अधिक परतावा :
BSE निर्देशाकावर जय कॉर्पच्या शेअर्समध्ये तब्बल 310.2 टक्के ची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. याचा अर्थ असा की कोविडच्या पहिल्या लाटेपासून 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, जय कॉर्पच्या शेअर्समध्ये 4 पट अधिक वाढ झाली आहे. जर तुम्ही मार्च 2020 च्या अखेरीस जय कॉर्प च्या शेअर्स वर तुमचे पैसे लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य चौपट झाले असते. 2003 साली जय कॉर्प च्या शेअर्सची किंमत 2 रुपये पेक्षा कमी होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.