18 February 2025 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर घसरतोय, पण टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढे मजबूत कमाईची होणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | 36 टक्के कमाईची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 50 रुपयांच्या खाली घसरणार, 6 महिन्यात 37% घसरला शेअर - NSE: SUZLON SBI Mutual Fund | SBI फंडाच्या मजबूत AUM असणाऱ्या योजना, डोळेझाकुन पैसा गुंतवा, 23 ते 34 लाख परतावा मिळेल SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Viral Video | व्वा रं पठ्या! ...म्हणे मित्रांनी सरप्राईज दिले, वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या बहाद्दरावर गुन्हा दाखल, व्हिडिओ पहा

Viral Video

Viral Video | आजकालची न्यू जनरेशन जेव्हा वाढदिवस साजरा करते तेव्हा ते ट्रेंड होऊन जाते, आता असं म्हणण्यामागील कारण असे की, आजकालची तरुण पीढी वाढदिवसादिवस हा चौकात साजरी करतात आणि तोही तलवारीच्या सहाय्याने कट करतात, पण असं करणं त्यांना महागात पडतं. असचं काहीसं एका मुलाने केलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, मुलगा त्याच्या वाढदिवसा दिवशी 21 केक कापतो आणि तेही तलवारीच्या सहाय्याने हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही, त्या मुलाला व त्याच्या मित्रांना हा वाढदिवस चांगलाच लक्षात राहणार आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, तुमच्या वाढदिवसादिवशी तुमच्यावर गुन्हा दाखल व्हावा असे कुणालाही कल्पनेमध्ये वाटणार नाही. मात्र असंच काहीसं तरी एका मुलाच्या बाबतीमध्ये घडले आहे. मित्रांनी सरप्राईज देण्यासाठी केलेला प्लॅन मात्र बर्थडे बॉयवर पलटला म्हणायला हरकत नाही. मुलांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रटंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या बोरीवली भागातील आहे. व्हिडीओमधील 17 वर्षीय मुलावर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तलवार वापरणे बेकायदेशीर आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया म्हणता म्हणता कितीतरी व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल होत आहे. शिवाय, हा व्हिडिओ शुक्रवारी 16 सप्टेंबरच्या रात्री 9 ते 9:30 च्या दरम्यानचा आहे तसेच एका पत्रकाराने मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करणारा व्हिडिओ शेअर केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्या अनेक घटना घडल्या आहेत
याआधीही अनेक भागांमधून अश्याच तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. असे ही काही लोक आहेत ज्यांना आपला वाढदिवस संस्मरणीय करायचा आहे मात्र ते लोक कायद्याचे उल्लंघन करून काही तरी उलट सुलट करायला जातात आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. शस्त्रांचा वापर करून लोक कुठेही आपला वाढदिवस साजरा करतात. कोणी हॉटेल मध्ये जाते तर कोणी, पबमध्ये, आणि असेही बहाद्दर असतात जे डायरेक्ट चौक गाठतात. मात्र यामागील कारण म्हणजे ते शस्त्रांचा वापर करून आपली दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. असे बरेचसे केस समोर आले आहेत आणि त्यांना त्यांचा वाढदिवस महागात पडला आहे. सदर घटनेचे व्हिडीओ शुटिंग करून मित्रांनी सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: A boy cuts a cake with a sword on his birthday Checks details 20 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x