
Penny Stocks | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स 1 टक्क्यांहून अधिक तेजीसह ट्रेड करत आहेत. ता तेजीत मेगा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. आज या शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. (मेगा कॉर्पोरेशन कंपनी अंश)
पेनी शेअरने मल्टीबॅगर परतावा दिला
शुक्रवारी मेगा कॉर्पोरेशन हा शेअर ३.३ रुपयांवर ट्रेड करत होता. सोमवारी मेगा कॉर्पोरेशन शेअर्सची जोरदार खरेदी सुरु झाली आहे. मेगा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 63.6 कोटी रुपये आहे. मेगा कॉर्पोरेशन कंपनीच्या या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
मेगा कॉर्पोरेशन शेअरने गुंतवणूकदारांना 1282% परतावा दिला
मेगा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर सोमवारी 4.95 टक्क्यांनी वाढून 3.18 रुपयांवर पोहोचला होता. मागील 6 महिन्यांत मेगा कॉर्पोरेशन शेअरमध्ये 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या १ वर्षात या शेअरने 28.74% परतावा दिला आहे. त्याचबरोबर 5 वर्षांच्या कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. या कालावधीत मेगा कॉर्पोरेशन शेअरने गुंतवणूकदारांना 1,282.61% परतावा दिला आहे.
कंपनीने राइट्स इश्यू तारीख जाहीर केली
मेगा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने राइट्स इश्यूची तारीख जाहीर केली आहे. मेगा कॉर्पोरेशन कंपनीचा राइट्स इश्यू 7 जानेवारी 2025 रोजी खुला होईल आणि 17 जानेवारी 2025 रोजी बंद होणार आहे. मेगा कॉर्पोरेशन कंपनीने राइट्स इश्यूसाठी २० डिसेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. मेगा कॉर्पोरेशन कंपनी राइट्स इश्यूच्या माध्यमातून प्रत्येकी एक रुपये दराने १०,००,००,००० इक्विटी शेअर्स ऑफर करणार आहे, ज्याची किंमत १० कोटी रुपये असेल. म्हणजे शेअरहोल्डर्सकडे असलेल्या प्रत्येक 1 शेअरसाठी मेगा कॉर्पोरेशन कंपनी 1 राइट शेअर जारी करेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.