12 December 2024 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Olectra Greentech Share Price | बंपर परतावा! या कंपनीचे गुंतवणुकदार श्रीमंत झाले, स्टॉकमधील तेजीचा फायदा घेणार?

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 6185.28 टक्के वर गेली आहे. यानुसार, जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य वाढून 62.85 लाख रुपये झाले असते. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून ओळखले जातात. 22 मार्च 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 624.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 248.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Olectra Greentech Limited)

‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ ही भारतातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. इलेक्ट्रिक बसेसच्या कमर्शियल व्यवसायात अग्रणी असलेल्या या कंपनीने आता ई-मोबिलिटी विभागात 3 चाकी इलेक्ट्रिक ऑटो आणि इलेक्ट्रिक ट्रक उत्पादन क्षेत्रात विस्तार केला आहे. रिलायन्स कंपनीसोबत तांत्रिक भागीदारी करून ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने हायड्रोजन बस विकसित केली. हायड्रोजन बस पारंपारिक सार्वजनिक वाहतुकीला पूर्णपणे कार्बनमुक्त पर्याय म्हणून निर्माण करण्यात आली आहे.

‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल सध्या 5,088.60 कोटी रुपये आहे. ऑलेक्ट्रा ही स्मॉलकॅप कंपनी मानली जाते. सेबीकडे उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 50.02 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर उर्वरित 49.98 टक्के हिस्सा सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केला आहे. हा शेअर रिटेल गुंतवणूकदारांच्या पसंतीचा स्टॉक आहे. रिटेल गुंतवणुकदार ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे सुमारे 23 टक्के भाग भांडवल होल्ड करत आहेत. तर परकीय गुंतवणुकदार 8.96 टक्के भाग भांडवल होल्ड करत आहेत.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
मागील दहा वर्षापासून ते आर्थिक वर्ष 2021-22 पर्यंत ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीची निव्वळ सेल्स आठ पट वाढली असून 593.26 कोटी रुपयेवर गेली आहे. 2012-13 या आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण सेल्स 70.07 कोटी रुपये होता. दरम्यान कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये 3 कोटी रुपये होता, जो 2021-22 मध्ये वाढून 35.36 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. कंपनीचा निव्वळ नफा या काळात 14 टक्क्यांनी वाढला असून 14 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीची निव्वळ विक्री 23 टक्क्यांनी वाढली असून 256 कोटी रुपये नोंदवली गेली आहे.

इतर कालावधीमधील परतावा :
‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 25.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीने लोकांना 6.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीने लोकांना 20.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीने शेअर धारकांना 248.69 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price on 29 March 2023.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x