 
						Penny Stocks | जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये मजबूत आर्थिक बाजू असणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर थोडा संयम राखावा आणि योग्य परतावा मिळताच स्टॉक विकून प्रॉफिट बुक करावे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. ज्या लोकांनी सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले आहेत, त्यांना संयम राखण्याचे गोड फळ मिळाले आहे. या कंपनीने यावर्षी आपल्या पात्र शेअर धारकांना बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. या कंपनीच्या स्टॉकने लोकांना बक्कळ परतावा दिला आहे, म्हणून आज या लेखात आपण या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेड :
2022 या चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यात या कंपनीचे शेअर्स 55.40 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चाक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर शेअर्समध्ये नफावसुली सुरू झाली स्टॉक वरच्या पातळीवरून तुटले. स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला होता आणि त्यामुळे स्टॉकची किंमत 22 टक्क्यांनी पडली आहे. मागील 5 वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर फक्त 1.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र त्यात आता वाढ होऊन स्टॉक 19 रुपयेवर ट्रेड करत आहेत. 17 फेब्रुवारी 2017 रोजी या कंपनीचे शेअर फक्त 0.56 पैशांवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 19 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच या स्मॉल कॅप पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3300 टक्के परतावा कमावून दिला आहे.
सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेड कंपनीने मे 2022 मध्ये आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप केले होते. मे महिन्यात कंपनी शेअर्स एक्स-बोनसवर ट्रेड करत होती. त्यावेळी संचालक मंडळाने कंपनीच्या प्रत्येक एका शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली होती. जर तुम्ही सिंधू ट्रेड लिंक्स कंपनीच्या शेअरमध्ये 0.56 रुपये किमतीवर 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला 1,78,751 शेअर्स मिळाले असते. बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर तुमच्या कडील शेअर्सची संख्या एकूण 3,57,142 वर गेली असती. अशाप्रकारे तुमच्या 1 लाख रुपये गुंतवणूकीचे मूल्य वाढून 67 लाख रुपये झाले असते.
सिंधू ट्रेड लिंक्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 55.40 रुपये आहे. तर या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 16.55 रुपये होती. सध्या या स्टॉकने 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीला स्पर्श केल्यानंतर आता पुन्हा तेजी पकडली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		