
Penny Stocks | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक मागील तीन दिवसांपासून फोकसमध्ये आहे. सोमवारी सुद्धा स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअरने अपर सर्किट हिट केला. सलग तीन दिवस स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. अवघ्या तीन दिवसांत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअर्समध्ये १५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअर 2.17 टक्क्यांनी वाढून 0.94 रुपयांवर पोहोचला होता. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 3.52 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 0.81 रुपये होती. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 163 कोटी रुपये आहे. पेनी स्टॉक मधील तेजी मागील एक प्रमुख कारण म्हणजे कंपनीने नुकतीच निधी उभारण्याची घोषणा केली आहे.
तपशील काय आहे?
स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगद्वारेमाहिती देताना म्हटले की, ‘कंपनी विस्तार करण्यासाठी 71 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. हा निधी मागील 113 कोटी रुपयांच्या निधी व्यतिरिक्त आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की, ‘नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स मध्ये 5 अब्ज रुपयांच्या यशस्वीरीत्या जारी केल्यानंतर ही घोषणा केली आहे.
स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने आपल्या ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चरला अधिक सक्षम करण्यासाठी 2.01 अब्ज रुपये उभे केले आहेत आणि वाटप केले आहेत. कंपनी संचालक मंडळाच्या सदस्यांनी 17 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीत 4,500 अनरेटेड अनलिस्टेड सिक्युरिटी एनसीडीच्या वाटपास मान्यता दिली होती असं फायलिंगमध्ये म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.