Penny Stocks | मोठी संधी, एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये दिला 359% परतावा – Marathi News

Penny Stocks | सनशाइन कॅपिटल या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी सनशाइन कॅपिटल कंपनीचे शेअर 4.2 टक्के वाढीसह 2.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे या कंपनीने नुकताच एका नवीन क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याची घोषणा केली आहे. (सनशाइन कॅपिटल कंपनी अंश)

कंपनी फिनटेक क्षेत्रात व्यवसाय विस्तार करणार
आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी सनशाइन कॅपिटल कंपनीचे शेअर्स 3.56 टक्के घसरणीसह 2.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सनशाइन कॅपिटल कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, कंपनी पुढील काळात फिनटेक क्षेत्रात व्यवसाय विस्तार करणार आहे. तसेच ही कंपनी आपली बाजारपेठ वाढवून ऑपरेशनल खर्च देखील कमी करणार आहे. यामुळे कंपनी आपल्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देऊ शकेल.

मागील 6 महिन्यांत सनशाइन कॅपिटल कंपनीच्या शेअरने फारशी उत्साहवर्धक कामगिरी केलेली दिसत नाही. 2024 या वर्षात सनशाइन कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 82.93 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 1 वर्षात 359% परतावा दिला
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 359 टक्के नफा कमवून दिला आहे. मागील 5 वर्षांत सनशाइन कॅपिटल कंपनीच्या शेअरची किंमत 3114 टक्के वाढली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.18 हजार कोटी आहे.

Latest Marathi News | Penny Stocks of Sunshine Capital Share Price 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.