
Penny Stocks | ग्लोबल मार्केटमधील संकेतांमुळे गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. लवकरच कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. गुरुवारी सेन्सेक्समध्ये ५२८ अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. तसेच निफ्टीमध्ये देखील 23,550 च्या खाली घसरला आहे. या घसरणीत विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. हा पेनी शेअर १ रुपयांहून स्वस्त आहे.
विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर सध्या 0.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1.27 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 0.68 पैसे होता. विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 43.8 कोटी रुपये आहे.
विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीबद्दल
विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीत प्रोमोटोर्स होल्डिंग 5.95 टक्के आहे. विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीत एफआयआय आणि डीआयआयची हिस्सेदारी नाही. यावर्षी विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने 113 टक्के इतका सेल्स ग्रोथ नोंदवला आहे.
विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ वर्षात विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरने 837.50%% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरने 1,775% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.