
Penny Stocks | आदि इंडस्ट्रीज या पेट्रोकेमिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 6.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Aadi Industries Share Price
आज शनिवारी सेबीने विशेष ट्रेडिंग सेशनचे आयोजन केले होते. या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये देखील आदि इंडस्ट्रीज या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत होते. आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आदि इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 10.15 टक्के वाढीसह 6.62 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील तीन दिवसापासून आदि इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8.90 रुपये होती. गेल्या वर्षी ऑगस्ट 2023 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 3.01 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.
डिसेंबर 2023 तिमाहीत आदि इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 24.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 75.14 टक्के भाग भांडवल धारण केले होते. कंपनीचे वैयक्तिक प्रवर्तक ऋषभ साह यांनी कंपनीचे 24,86,429 शेअर्स होल्ड केले आहे.
आदि इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः प्लास्टिकच्या कच्च्या मालाचा व्यवसाय करते. विविध उद्योग क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्लास्टिकच्या कच्चा मालाचा वापर केला जातो. ही कंपनी मुख्यत्वे कमोडिटी, अभियांत्रिकी आणि विशेष प्लास्टिक म्हणून वर्गीकृत प्लास्टिकच्या कच्चा मालाचा व्यवहार करते. कमोडिटी प्लॅस्टिकमध्ये पॉलिथिलीन, पॉलीप्रॉपिलीन, पॉलीव्हिनिल क्लोराईड आणि पॉलिस्टीरिन यांचा समावेश होतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.