 
						Penny Stocks To Buy | शाह मेटाकॉर्प या 5 रुपयेपेक्षा स्वस्त कंपनीच्या शेअरने अवघ्या 3 दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शाह मेटाकॉर्प कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांच्या वाढीसह 5.50 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. Shah Metacorp Share Price
मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील 3 दिवसांत या कंपनीच्या शेअरने परताव्याचा बाबतीत मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सना मागे टाकले आहे. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी शाह मेटाकॉर्प कंपनीचे शेअर्स 4.21 टक्के घसरणीसह 4.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शाह मेटाकॉर्प कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 4.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 3 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका महिन्यात शाह मेटाकॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 66 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शाह मेटाकॉर्प कंपनीच्या प्रवर्तकांनी जून 2023 तिमाहीत आपले शेअर होल्डिंग प्रमाण 38.19 टक्क्यांवरून वाढवून 39.52 टक्क्यांवर नेले आहे.
सप्टेंबर 2023 तिमाहीत शाह मेटाकॉर्प कंपनीने उत्पन्नात 16.51 टक्के वाढ नोंदवली होती. मात्र उत्पन्न वाढीसह कंपनीच्या खर्चात देखील 20.56 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षात शाह मेटाकॉर्प कंपनीने एकूण 46.88 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात कंपनीचा नफा 1.65 कोटी रुपये होता. तर चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत शाह मेटाकॉर्प कंपनीने 22.42 कोटी रुपये महसूल संकलित केला होता आणि त्यात कंपनीने 0.76 कोटी रुपये नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		