15 December 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Committed Cargo Care IPO | आला रे आला IPO आला! कमिटेड कार्गो केअर IPO शेअरची प्राईस बँड स्वस्त, पहिल्याच दिवशी 30% कमाई करा

Committed Cargo Care IPO

Committed Cargo Care IPO | कमिटेड कार्गो केअर लिमिटेड कंपनीचा IPO शुक्रवारपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कमिटेड कार्गो कंपनीचा IPO 5 दिवस गुंतवणुकीसाठी खुला राहील. हा IPO मंगळवारी सबस्क्रिप्शनसाठी बंद होईल. कमिटेड कार्गो कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 77 रुपये निश्चित केली आहे. मागील आर्थिक वर्षात, कमिटेड कार्गो केअर कंपनीने 122 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर कंपनीचा PAT 5.33 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

कमिटेड कार्गो केअर लिमिटेड या इंटिग्रेटेड लॉजिस्टिक कंपनीने आपल्या IPO मध्ये 24.95 कोटी शेअर्ससाठी 77 रुपये प्राइस बँड निश्चित केली आहे. कमिटेड कार्गो कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची मुदत 10 ऑक्टोबर 2023 असेल. कमिटेड कार्गो IPO स्टॉक नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील.

कमिटेड कार्गो केअर लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 32.5 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. IPO द्वारे उभारलेली रक्कम कंपनी भांडवली कामकाजाच्या गरजा आणि इतर कॉर्पोरेट हेतूंवे खर्च करणार आहे. एका लॉटमध्ये कंपनी 1600 इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. कमिटेड कार्गो कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 23 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्रे मार्केटमधील कामगिरी पाहून असे वाटते की, कमिटेड कार्गो कंपनीचे शेअर्स गुंतवणूक केल्यास चांगला फायदा देतील. ग्रे मार्केट किंमत आणि इश्यू किंमत पाहता हा स्टॉक 95 रुपये ते 100 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच या IPO मधून गुंतवणूकदारांना 21 ते 30 टक्के नफा सहज मिळू शकतो. कमिटेड कार्गोच्या IPO मध्ये गुंतवणूक करून किमान लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.32 लाख रुपये जमा करावे लागतील.

कमिटेड कार्गो केअर कंपनीच्या IPO शेअर्सचे वाटप 13 ऑक्टोबर 2023 रोजी केले जातील. आणि हा IPO स्टॉक 18 ऑक्टोबर 2023 रोजी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध केला जाईल. कमिटेड कार्गो ही कंपनी एक तृतीय पक्ष लॉजिस्टिक सेवा प्रदान करणारी कंपनी आहे, जी आयात आणि निर्यात कार्गो संबधित व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Committed Cargo Care IPO today on 09 October 2023.

हॅशटॅग्स

Committed Cargo Care IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x