Permanent Magnets Share Price | गुंतवणुकदार नेहमी गुंतवणूक करताना असे शेअर्स शोधतात, ज्यात अल्पावधीत मजबूत परतावा मिळेल. यासाठी अनेक तज्ञ गुंतवणुकीसाठी शेअर्स सुचवत असतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत.
शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर तुम्ही शॉर्ट टर्म ते दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकता. शेअर बाजारातील दिग्गज तज्ञ आणि गुंतवणुकदारांनी 4-6 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्यायोग्य एक स्टॉक निवडला आहे. हा स्टॉक पुढील काळात गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार करु शकतात. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल
पर्मनंट मॅग्नेटस – स्टॉक खरेदी करा
* सध्याची किंमत – 965 रुपये
* लक्ष्य किंमत – 1070/1090
* गुंतवणूक कालावधी – 4 ते 6 महिने
पर्मनंट मॅग्नेटस कंपनीबद्दल थोडक्यात
पर्मनंट मॅग्नेटस ही कंपनी 2005 पर्यंत मॅग्नेट बनवण्याचे काम करत होती. तज्ज्ञाने सांगितले की, पूर्वी ही कंपनी ऑटोमोबाईल क्षेत्राला आपले उत्पादन पुरवत होती. आता कंपनीकडे 3 उत्पादन केंद्र आहेत. याशिवाय कंपनीकडे 475 कर्मचारी आणि 72 अभियंते आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या व्यवसाय वाढ आणि तिमाही कामगिरीच्या आधारावर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
पर्मनंट मॅग्नेटस शेअरचा परतावा
मागील 5 वर्षात पर्मनंट मॅग्नेटस कंपनीच्या नफ्यात 40 टक्के वाढ झाली आहे. तर कंपनीच्या विक्रीमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. तज्ञाने पूर्वी या स्टॉकवर 400 रुपयेच्या आसपास ट्रेड करत असताना 450 रुपये लक्ष किंमत निश्चित केली होती. आता तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करून 1070-1090 रुपये लक्ष किमतीसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.