15 December 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी
x

IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार?

IRFC Vs RVNL Share

IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 7.20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. काल देखील या स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली होती. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

मात्र आज हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आरव्हीएनएल कंपनीला 229 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. आज गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.86 टक्के घसरणीसह 253.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सेबीला दिलेल्या माहितीत आरव्हीएनएल कंपनीने कळवले आहे की, त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार कंपनीला कोलकाता येथील निवासी वसाहतीत एक अंडरपास बांधण्याचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे एकूण मुल्य 229.43 कोटी रुपये आहे. रेल्वे विकास निगम कंपनीचे शेअर्स निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकातील सर्वोत्तम कामगिरी करणारे शेअर्स ठरले आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक 7 टक्के वाढीसह 267.80 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका वर्षभरात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 297 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 56 टक्के वाढली आहे. रेल विकास निगम कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा 72.80 टक्के आहे.

आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 63.70 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 54,314.77 कोटी रुपये आहे. रेल्वे विकास निगम कंपनीने दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली होती. या प्रोजेक्टचे एकूण मुल्य 167.28 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share NSE Live 28 March 2024.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x