10 May 2024 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीला CCI ने लँको अमरकंटक पॉवर लिमिटेड कंपनीचे अधिग्रहण करण्याची परवानगी दिली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक सुरुवातीच्या काही तासात 4 टक्क्यांच्या वाढीसह 543 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( अदानी पॉवर कंपनी अंश )

आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 589.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 166.40 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.86 टक्के वाढीसह 521 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यापासून अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये अस्थिरता पाहायला मिळत होती. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 194 टक्के वाढवले आहे.

लँको अमरकंटक पॉवर कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. ही कंपनी भारतात थर्मल पॉवर पासून ऊर्जा निर्मिती करण्याचा व्यवसाय करते. सध्या ही कंपनी दिवाळखोरी कोड, 2016 (IBC) अंतर्गत कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेला सामोरे जात आहे. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने लँको अमरकंटक पॉवर कंपनीचे 100 टक्के इक्विटी शेअर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

CCI च्या मते, या प्रस्तावित व्यवहाराचा भारतातील कोणत्याही ऊर्जा निर्मिती संबंधित व्यवसाय स्पर्धेवर विपरीत परिणाम होणार नाही. नुकताच CCI ने अदानी पॉवर कंपनीला लॅन्को अमरकंटक पॉवर कंपनीच्या अधिग्रहणासाठी परवानगी दिली आहे.

अदानी पॉवर कंपनीने या कर्जबाजारी कंपनीची खरेदी करण्यासाठी 4,101 कोटी रुपये बोली लावली होती. लँको अमरकंटक कंपनीकडे छत्तीसगड राज्यात प्रत्येकी 300-300 MW क्षमतेचे दोन थर्मल पॉवर युनिट आहेत. या अधिग्रहणमुळे अदानी पॉवर कंपनीची क्षमता आणखी वाढणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 28 March 2024.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x